Hey guys, मी आरूष. मला आज एक गोष्ट तुमच्यासोबत share करायची आहे. Actually ती गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना, rather मी केलेल्या चुकांची आहे.
कॉलेजचे दिवस, मी तिच्या प्रेमात पडलो. हळूहळू आम्ही बोलायला लागलो. कॉलेजच्या functions, trips, days अशा events मध्ये आम्ही सोबतच असायचो. आमचं बोलणं Instagram, नंतर whats app, SMS, आणि मग phone calls. बोलणं वाढत तर होतंच, आम्ही भेटायलाही लागलो. मी तिच्या messages ची वाट बघतोय हे तिला कळायचं. तिला हेही कळलं होतं की I have some feelings for her, आणि एक दिवस मग मी बोलूनच टाकलं आणि तिही म्हणाली – ‘yes, I Love You too’. स्वर्गसुख!
मी एक introvert मुलगा होतो. माझे कोणी जास्त मित्र – मैत्रिणी नव्हत्या. म्हणून जे काही बोलणं वगैरे व्हायचं ते तिच्यासोबतच. पहिले ३ महिने खूप छान गेले आमच्या relationship चे, like we were in the heaven. सगळं जग सुंदर वाटायला लागलं होतं, romantic. आणि आम्ही सोबतच असायचो कायम. पण exam आली, नंतर internship साठी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागलं, आणि त्यामुळे जास्त बोलणं आणि भेट होत नसायची.
तेव्हा मी खूप Possesive, insecure झालो होतो. जेव्हा ती कुणा दुसऱ्या मुलासोबत बोलायची, मला राग यायचा. तिच्यावर चिडायचो आणि त्यात तिला काहीही बोलून टाकायचो. ‘I think you have started liking him, you don’t love me anymore.’ किंवा जर तिने माझ्या messages ला लवकर reply नाही दिला तर ‘ तु माझ्यासाठी वेळ पण नाही काढू शकत कधी, तू मला avoid करतेय’. किंवा बऱ्याचदा एकच प्रश्न सारखा सारखा विचारायचो, जसं ‘ तू मला खरंच कधी सोडून नाही ना जाणार? ‘ आणि ती irritate व्हायची या असल्या repetative questions नी. ती चिडायची, जे obvious होतं. कारण, मी तिच्या प्रेमावर, तिच्या loyalty वर शंका घ्यायचो. तरी बऱ्याचदा ती शांत राहायची, कधीतरी चिडायची फक्त. त्यामुळे बऱ्याचदा माझ्या nonsense messages ला reply ही नाही द्यायची. मग माझा ego hurt व्हायचा, राग यायचा, Instagram reels खूप बघितल्या होत्या, बेवफाई की बहुत सारी काहानिया सूनी थी… त्यामुळे insecurity वाढायची, doubt यायचा अन् मग मी तिला paragraph मध्ये emotional आणि फालतू logic असणारे messages करायचो. ज्याने ती अजून चिडायची. एकदा तर चिडून मी तिच्यावर हातही उगारला होता.
असंच हळूहळू आमच्यातला bond weak व्हायला लागला. ती आपोआप माझ्यापासून दूर जायला लागली. तिचा विश्वास ढासळत होता. तिच्या आयुष्यातून आनंदच काढून घेतला होता मी जणू, मला बघितलं की तिचा चेहरा पडायचा. असं नाही की तिने मला समजावलं नाही किंवा time नाही दिला, पण तिची सहनशक्तीच संपली होती. आणि शेवटी तो दिवस आलाच, जेव्हा तिने मला सरळ सांगून टाकलं – ‘बस्स, संपलं आपल्यातलं सगळं. मी अजून नाही सहन करू शकत. I am breaking up with you Arush’. हे बोलतानाही स्वतःच रडत होती.
पण आमचं नातं तिथेच संपलं.
Actually, चुकी तिची नव्हती, माझी होती. तिने सांभाळण्याचा खरोखर प्रयत्न केला, पण मला कळलंच नाही. आणि जेव्हा कळलं तेव्हा ती गेलेली होती. मी फक्त माझाच विचार केला, मला जसं वाटतंय तसंच सगळं करण्याचा विचार केला. तिच्या मनाचा विचारच नाही केला कधी, तिला कसली गरज आहे ते कधीच नाही विचारलं. मी तिला control करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला care चं नाव दिलं. ती दिवसभर थकून यायची आणि जेव्हा लवकर झोपून घ्यायची किंवा माझ्या message चा, call चा लगेच reply देत नसायची तेव्हा मी तिला समजून घेण्यापेक्षा चिडायचो. ती मला avoid करतेय असं वाटायचं.
म्हणून breakup जरी तिने केलेलं असेल ना तरी चूक माझी होती. मी तिला भाग पाडलं ती step घ्यायला. माझ्या चुकीमुळे मी तिला गमावलं, तुम्ही अशी चूक नका करू.
जेव्हा तुम्ही कुणावर प्रेम करता ना, त्याला freedom द्या, मोकळं सोडा. जगुद्या त्याला. त्याला गमावण्याची भिती, insecurity तर राहील पण विश्वास ठेवा ना. आणि तो जपण्यासाठी त्यालाही space द्या. त्याला स्वतःला explore करायला, grow करायला motivate करा. त्याची काळजी करा, पण त्याला control करण्याचा प्रयत्न नका करू. पिंजऱ्यात अडकवण्यापेक्षा मोकळा श्वास घेऊ द्या ना. त्यांचीही personal space असते, ज्याची त्यांनाही गरज असते. आणि No Judgements हां. तुम्हाला काही वाटलं तर त्या व्यक्तीला विचारा, sort करून घ्या. पण मनातल्या मनात विचार करून judge नका करत बसू.
एक नातं सुरू तर होऊन जातं, सुरुवातीचे नवीन दिवस पण छान जातात. पण ते टिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, दोघांनीही एकमेकांना समजून घ्यावं लागतं. ते एक maturity level ला घेऊन यावं लागतं. जिथे तुम्ही दोघेही एक झालेले असतात आणि तरीही एकमेकांना बांधून न ठेवता मोकळं सोडतात. Get to that level…