आज आपण ज्या जाती व्यवस्थेबद्दल बोलतो, ज्या जाती बघतो, ती एका दिवसात अस्तित्वात नाही आली. तिला हजारो वर्षे लागली.
सुरुवात होती एका सोप्या कल्पनेने. प्राचीन ग्रंथांमध्ये समाजाची कल्पना एका मानवी शरीरासारखी केली गेली. यालाच वर्ण व्यवस्था म्हणतात.
• ब्राह्मण: विद्वान, पुजारी, शिक्षक
• क्षत्रिय: शासक, प्रशासन, योद्धा
• वैश्य: व्यापारी, शेतकरी
• शूद्र: सेवक, कारागीर
सुरुवातीला, ही कल्पना जरा loose होती. तुमची योग्यता (guna) आणि काम (karma) यावर ती अवलंबून होती, केवळ जन्मावर नाही.
पण कालांतराने, ही सोपी वर्णव्यवस्था जातींमध्ये बदलली. वर्ण ही theory होती, पण जात म्हणजे real life group. ‘Jatis’ means ‘birth’. आणि भारतात हजारो जाती तयार झाल्या, ज्या जन्मापासून माणसाला चिटकायला लागल्या.
जसजसं समाज आणि अर्थव्यवस्था अधिक गुंतागुंतीची झाले, नवीन व्यवसाय निर्माण झाले. प्रत्येक व्यवसाय (occupation) बहुतेक वेळा स्वतःच्या स्वतःमध्ये लग्न करणाऱ्या समुदायात विकसित झाला आणि एक नवीन जात तयार झाली. उदाहरणार्थ, कुंभार, विणकर, लोहार, सोनार, सुतार इ. सर्व वेगवेगळ्या जाती बनल्या. प्रत्येक जातीचा एक पारंपारिक व्यवसाय होता, ज्यामुळे जात आणि व्यवसाय एकमेकांशी जोडले गेले. जिथे व्यक्तीला जन्मानेच त्यांच्या पालकांकडून जात आणि त्याचा व्यवसाय वारशाने मिळायचा. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये स्थलांतरित झालेले समुदाय अलग झाले. विविध धार्मिक पंथ किंवा गुरूंचे अनुयायी कधीकधी स्वतःचे स्वतःमध्ये लग्न करणारे समुदाय तयार केलेत.
भारतातील जातीव्यवस्थेला गंभीरतेने पाळण्याच्या मागे मुख्यतः तीन कारणे होती. धार्मिकदृष्ट्या, कर्म आणि पुनर्जन्म यावरील विश्वासाने ही व्यवस्था मजबूत झाली; एखाद्याचा विशिष्ट जातीत जन्म हा मागील जन्मातील कर्मांचा फळ असल्याचे मानले जाई. स्वधर्म पाळणे हे पुढच्या जन्मासाठी आवश्यक समजले जात असे. आर्थिकदृष्ट्या, ग्रामीण भागातील जजमानी(सेवांची अदलाबदल) पद्धतीमुळे प्रत्येक जातीची एक निश्चित व्यावसायिक भूमिका होती आणि सेवांच्या अदलाबदलीच्या या विकेंद्रित व्यवस्थेमुळे सर्व जाती परस्परावलंबी झाल्या. समाजातून बाहेर पाडण्याची भीती, आपली संपत्ती आणि सामाजिक दर्जा टिकून रहावा, सामाजिक नियंत्रण टिकून राहावे. अशाप्रकारे, धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक या तीनही स्तरांवर जातीव्यवस्था दृढमूल झाली.
जातीबाहेर, विशेष करून आपल्यापेक्षा खालील जातीत लग्न करणे हे रक्त अपवित्र/दूषित झालं अस मानलं जायला लागलं. आपले skills, आपले व्यावसायिक secrets, आणि family wealth सुरक्षित ठेवण्यासाठी, जात टिकवून ठेवण्यासाठी फक्त आपल्या जातीतच लग्न करायचं. यालाच endogamy म्हणतात.
पण माझा प्रश्न हा आहे की…
आजचं जग पूर्णपणे बदललं आहे. कुंभाराचा मुलगा आता engineer झालाय, कोणी doctor झालं आहे. सुताराचा मुलगा सरकारी अधिकारी आहे. वंजारी समाज, जे एकेकाळी साम्राज्यांच्या supply chain चे back bone होते, त्यांची मुलं आता offices मध्ये काम करतात. म्हणजे, आडनाव आणि व्यवसाय यातला दुवा तुटलाय. Occupation-based division पूर्णपणे नाहीसं झालंय. तर आज जातीचं खरं कार्य काय आहे? फक्त लग्नं? So called “इज्जत”?
The original purpose — occupation division — is completely dead. What remains is its shadow: a tool for power, politics, and control, wrapped in the empty package of “izzat.”