अशी एक व्यक्ती तरी असेल ना!

कोणीतरी असेल ना यार
जी तुमच्यावर पण तितकच प्रेम करेल जितकं तुम्ही तिच्यावर करता
जिला सतत सांगण्याची गरज नाही पडणार की ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे,
किंवा तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे.
तीला तुमच्या डोळ्यांतच दिसून जाईल ते.
तुम्हाला ही भीती नाही वाटणार की
मी थोडं दूर गेलो काही काळ तर ही व्यक्ती दुसऱ्या कुणाची तरी होईल,
तिच्या attention साठी तुम्हाला तडपावं नाही लागणार.
तिने mesaage करावा
Call करावा
वेळ द्यावा
भेटावं
यासाठी सारखं विचारावं नाही लागणार,
ती स्वतः ते सर्व करेल.
अशी व्यक्ती
जिच्यासमोर तुम्हाला दिखावा नाही करावा लागणार,
तुमचा राग, तुमच्या insecurities लपवून नाही ठेवाव्या लागणार,
जीच्यासोबात तुम्ही काहीही share करू शकता.
जी तुम्हाला समजून घेईल
तुम्हाला त्रास होत असेल तर जवळ घेईल,
तुमच्या efforts ची कदर करेल.
तुम्हाला low feel होत असेल तर
हातात हात घेऊन,
डोळ्यांत डोळे घालून
‘सगळं ठीक होईल आणि मी आहे ना सोबत कायम. आपण दोघे मिळून सगळं नीट करू’
असं बोलेल.
जिच्याकरिता तुम्ही
वेळ मिळाला म्हणून बोलू
किंवा तुम्हाला वाईट नको वाटायला म्हणून बोलायचं
असं न करता
तुम्ही तिची priority असाल आणि म्हणून ती वेळ काढून बोलेल.
Situation काहीही असो
पण तुम्हाला विश्वास असेल
की ही व्यक्ती हात नाही सोडणार,
कायम साथ देईल
कायम काळजी घेईल, सांभाळेल.
जी तुमच्यावर विश्वास ठेवेल,
तुमच्या स्वप्नांना पंख देईल,
कायम support करेल.
जीच्यासोबत तुम्ही असाल तर वेळेचं भान नाही राहणार
कितीही वेळ न बोलताही
एकमेकांसोबत घालवू शकता.
अशी एक व्यक्ती तरी असेल ना!

Then why to settle in less?

Leave a Comment

Scroll to Top