पहिलेच कामाचा ताण,
त्यात पावसाची चिकचिक
आणि आता छत्री उघडत नाहीये.
तिची चिड चिड व्हायला लागली,
त्यात तो तिथे आला.
छत्री उघडत
‘चल चहा पिऊ..’ तो म्हणाला
‘नकोय मला’ तिचा मूड खराब होता.
पण तो गेला घेऊन तिला चहाच्या टपरीवर,
तिची छत्री बंद होत नाहीये म्हणून तिची अजूनच चिड चिड वाढली.
त्याने हळूच हसत
छत्री बंद करत
‘दोन कटिंग’ order दिली.
मग तो मुद्दाम तिला धक्के देऊ लागला
तेव्हा अजूनच चिडली ती.
मग लागली बोलायला त्याला
कामाचं कसं tension आहे, चिडचीड कशी होतेय
सांगायला लागली.
तो चहाचा कप हातात घेऊन
शांत तिचं ऐकत होता.
पण आता तिही हसायला लागली होती
थोडं हलकं वाटायला लागलं होतं.
चहाचे कप ठेऊन, पैसे देऊन
त्याने पुन्हा छत्री उघडली.
तिला खांद्यावर हात ठेऊन जवळ घेतलं,
आणि दोघेही bus stop कडे निघाले.
तेव्हा समाधानाने त्याच्याकडे बघत
‘आपले मूड, आपली चीडचीड, आपले नखरे सांभाळत
हा इतकं प्रेम करत असेल आपल्यावर
तर अजून काय हवंय!‘