जर मला ‘काहीतरी मिळवायचंय, काहीतरी करावं लागेल, नाहीतर काही खरं नाही’, अशी भिती नसेल तर मी काय काम केलं असतं? आयुष्याला असा कोणता अर्थ दिला असता, जो भितीने नाही तर आतुन, इच्छेने, आनंदाने आला असता?
असं काय आहे जे मी पूर्ण आयुष्य करू शकतो? खरोखर मला ते करावसं वाटेल. ज्यामुळे आजपासून १० वर्षानी मला त्याबद्दल पश्चाताप नाही होणार, कधी एकट्यात असलो तरी मी पूर्णपणे शांत असेन, समाधानी असेन. त्यात मग काही मिळविण्याची आणि काही गमावण्याची भिती नसेल, काहीच नाही. काय आहे असं?
असं काय आहे माझ्यात, मला काय जमतं? मला असं काय आवडतं, जे मी कितीही वेळ करत बसतो?
असं काय आहे जे मला या जगात असलेलं बघायचंय? माझ्या आयुष्याचा अर्थ आहे काय नेमका?
काय म्हणून माझी ओळख आहे किंवा असायला हवी? माझं क्षेत्र कोणतं आहे?
असं कोणतं काम आहे, जे करताना मला खुप भारी वाटतं, बाकी कसलंच भान नसतं? काहीतरी मिळविण्यापेक्षा, असं काय आहे जे मला ‘करायचंय’? काहीतरी मिळविण्यासाठी नाही. मला माझं करिअर घडविण्याची भिती नसेल तर मी काय काम केलं असतं?
माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, उद्देश्य काय आहे?