संवाद-३

विक्रम: अगं, चांगला तर आहे सगळ. आणि चाळीस एकर जमीन, मोठा बंगला, प्रत्येकाला वेगळी गाडी, नोकर-चाकर, भारी तर आहे सगळ..
सायली: मग? मी काय करू मग त्याला?
विक्रम: अगं, मग तू नकारतेस का या संबंधाला?
सायली: अरे,.. पैसे, गाडी, बंगला, जमीन या गोष्टिंमुळे लग्न नाही करणारये मी. मला ना… मला कसा मुलगा हवाय सांगू?
विक्रम; बोला…
सायली: मुलगा असा असावा ना ज्याचे स्वतःचे काही स्वप्न आहेत, जे पूर्ण करण्यासाठी जो धडपड करत असतो.
तुला सांगू का, जो माणूस स्वप्न नाही ना पाहू शकत, तो माणूस कधीच प्रेम नाही करू शकत.
विक्रम: काय? नविनचय …
सायली: स्वप्न बघायला विश्वास लागतो, आणि जो स्वतःवरच विश्वास नाही ठेऊ शकत तो काय प्रेम करणार!
मला असा मुलगा हवाय जो छोट्या छोट्या गोष्टिंमध्ये आनंद शोधील. तो असा असावा ना, जो फक्त माझाच नाही तर सगळ्यांचा विचार करीन, माझ्यासह सर्वांची काळजी घेईन, फक्त माझीच नाही, आणि मलाही ते आवडनार नाही.
विक्रम: ओ मॅडम, तू शुद्धितच बोलतेय ना का स्वप्नात गेली. एखाद्या मुलीच्या तोंडून हे पहिल्यांदा ऐकतोय मी…
सायली: _ _ _
विक्रम: बाकीच्या मुली घर, नोकरी, बंगला, गाडी असल्या गोष्टिंचीच जास्त मागणी करताना पाहिल्याय. ह्या मुलाकडे एवढं आहे म्हणजे तुझे घरचे तयार झालेच असतील लगेच?
सायली: Hmm
विक्रम: अवघडय, तुझ्या जाग्यावर दूसरी एखादी मुलगी असती ना तर हे सगळ पाहून आणि घरचे तयार आहेत म्हणून लगेच हो म्हणाली असती,भले कितीही तडजोड करावी लागो.
पण, हे सगळ खुळ तुझ्या पप्पाला माहितीय का?
सायली: पप्पाला… तसं अजुन स्पष्ट बोलले नाही मी. आणि मी काय पळून-बिळुन थोडी जाणारये? फक्त असाच मुलगा हवाय मला बस, नाहीतर…
विक्रम: नाहीतर, नाहीतर काय?
सायली: असा मुलगा असेल का रे कुठे?
विक्रम: Ummm… मला सांग, आजपर्यंत अशा मुलाचं चित्र डोळ्यांसमोर उभं करू शकलीस का कधी तू?
सायली: खुपदा..बऱ्याचदा केलंय. कधिकधी तर आपोआप झालंय.
विक्रम: जास्त काळजी नको करू. कदाचित थोडी वाट पहावी लागेन पण तो नक्की भेटेन.
एकतर तो तसा भेटेल, नाहीतर तुझं प्रेम त्याला तसं बनविल, हे नक्की.
आणि हो अजुन एक…
सायली: _ _ _
विक्रम: एवढ्या अपेक्षा केल्यात तू त्याच्याकडून, फक्त जे तुला त्याच्यात हवंय त्या गोष्टी तुझ्यातसुद्धा उतरव. जसा तो तुला हवाय, तशीच तूही हवीस.
सायली: Thanks यार, मी इतक्या मैत्रिणींसोबत हे share केलं, पण त्या मला फक्त हसल्याच. ‘असा कोणी भेटत नसतो’, असंच बोलल्या त्या. पण तुझ्यासोबत बोलून खरच भारी वाटलं.
विक्रम: तुला खरं सांगू, जर प्रेम असेल ना तर एका छोट्याश्या खोपटात, एका चुलीवरही संसार होतो. नाहीतर सगळ वीरान वाटतं.
सायली: Hmmm… अय तुला कशी मुलगी हवीय? सांग ना..
विक्रम: अगदी तुझ्यासारखी विचार करणारी…

Leave a Comment

Scroll to Top