जर आयुष्यात एखादी वाईट घटना घडली तर आपण तुटायला लागतो, आयुष्य नकोस व्हायला लागतं. तेवढ्यात कुणीतरी येऊन सांगतं ‘अरे जो होता हैं अच्छे के लिए होता हैं’. मग आपणही म्हणतो, ‘बरोबर असेल हे’. काय खरंच जे होतं ते चांगल्यासाठीच होतं का?
मी म्हणेन, हे आपल्यावर अवलंबून आहे. जर एखादी वाईट घटना घडली नि तुम्ही तिच्यासोबत deal करण्यासाठी, त्यातून स्वतःला सावरण्यासाठी कायम प्रयत्न केलेत, दररोज स्वतःला grow करत राहिलात आणि त्यामुळे तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळायला लागलेत, तर तुम्हीच म्हणाल – ‘जो हुआ सच में अच्छे के लिए हुआ. अगर वो नहीं होता तो मैं यहा नहीं होता.’
पण तेच जर तुम्ही त्या घटनेवर reaction म्हणून ‘जो होता हैं अच्छे के लिए होता हैं, अब मैं बडा आदमी बनने वाला हूँ ‘ म्हणत राहिलात नि चांगल्या परिणामांची फक्त वाट बघत बसलात, स्वतःला दिलासा देत राहिलात, काहीही काम न करता उगाच आनंदी राहण्याचा प्रयत्न केला, नशिबावर सगळं सोडून दिलंत, आणि काहीही न करता success फक्त visualize करत बसलात तर शेवटी तुम्हीच म्हणाल ‘हि दुनियाच वाईट आहे’.. तुम्ही त्या घटनेला नि दुनियेला फक्त वाईटच म्हणत राहाल.
म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्याचा शेवट परिणाम (final result) काय असेल हे आपल्याच हातात असतं. म्हणून जर काही वाईट घडलं तर direct ‘जो होता हैं अच्छे के लिए होता हैं ‘ यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यात स्वतःला कसं grow करता येईल नि चांगला माणूस कसं होता येईल हे बघा. फक्त visualize करत बसण्यापेक्षा काम करायला सुरुवात करा. कारण शेवटी कामच(work) result देणार आहे, आणि आनंदही.
अजून एक गोष्ट सांगून टाकतो. खूप लोकांचा हा प्रश्न असतो ‘अच्छे लोगो के साथ हि हमेशा बुरा क्यू होता हैं?’.. तर त्याचं उत्तर देईल – उनको और भी अच्छा बनाने के लिए... समझे??