मन माझं स्वप्नांत कधी रंगतं

मन माझं स्वप्नांत कधी रंगतं, सोबत त्याला तू दिसतेस,
‘अहो, ऐका ना’ म्हणून कधीतरी तू मला हाक मारावी,
‘अगं, ऐकलंस का?’ मीही तुला बोलवावं.
हातात हात घेऊनि, पावलांनी समुद्र लहान करावा,
उशास माझा हात, चांदण्या राती आकाश डोळ्यांत भरावा,
थकवा दिवसभराचा, तुझ्या हसण्याने विरुन तो जावा,
कामात सोबत एकमेकांची आपण करावी
कधीतरी खांद्यावर डोकं तुझं, टी व्ही समोर आपल्याच दुनियेत रमावं,
डोळ्यांत एकमेकांच्या जग सारं विसरून जावं,
तू आई मी बाबा, मुलांसोबत आपणही लहान व्हावं,
साथ एकमेकां देऊन, एकटं कधी न करावं,
साक्षीने एकदुसऱ्यांच्या म्हातारं आपण व्हावं,
प्रेमात आपल्या, जीवन सारं सामावून घ्यावं,
मन माझं स्वप्नांत कधी रंगतं, सोबत त्याला तू दिसतेस,

Leave a Comment

Scroll to Top