मला समजलेलं जीवन

आयुष्य एक, जन्म पुन्हा असेन नसेन,
आज आहे, उद्या असेन नसेन,
हाच क्षण खरा, पुढचा असेन नसेन.
मग कसला रे गर्व तुला?
जन्म हा माणसाचा, माणूस तू होण्यासाठी आहे,
एकदा आत डोकावून तर बघ, तुलाच बघशील,
प्रेम एकमेव सत्य, सत्यास का तू नाकारतोस?
तू लढ, भांड, वेळ आली तर चापट मार, पण नाती ती जपून ठेव.
दे अर्थ जीवनास, प्रेमात जीवनाच्या तू पडशील.
हसा, खेळा, मस्ती करा,
फक्त मिळालेलं हे जीवन उस्फुर्ततेनं जगा…

Leave a Comment

Scroll to Top