१. इतके पुस्तकं वाचण्याची गरज नव्हती. खूप सारे पुस्तकं तर स्वतःचा दुबळेपणा लपविण्यासाठी आणि जे करायचं आहे ते पुढे ढकलण्यासाठी वाचले. पुस्तकं हे फक्त मार्ग दाखवतात, त्यावर चालायला सुरुवात आपल्याला करावी लागते.
२. बहुतेक वेळा आपण स्वतःच आपलं आयुष्य अवघड बनवून टाकतो. प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढून, अतिविचार करून. सर्वात महत्वाचं म्हणजे गरज नसताना मनात भीती बाळगणे.
३. ‘लढण्यासाठी प्रेरणा गरजेची असते’, हे नाही तर लढणे हीच खरी प्रेरणा आहे.
४. बहुतांशी प्रश्न, ज्यांचे उत्तर बाहेरच्या जगात नाही तर आपल्या आत मध्येच असतात, आपल्याला त्यांची उत्तरं माहीत असतात. फक्त गरज असते ती भीती बाजूला करून स्वतःला शांत करण्याची.
५. जर ध्येय नसेल, एखादं काम ‘का’ करायचं आहे हे माहीत नसेल तर आपण कुठेही नाही पोहोचणार. आणि हळूहळू ते काम करण्याची प्रेरणाही मिटून जाईन. तसंच ‘का’ माहीत नसेन तर कोणीही आणि काहीही आपल्याला distract करू शकतं.
६. माणसाच्या आयुष्याचं काहीतरी ध्येय आहे, ते जाणून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
७. इथे चांगलं आणि वाईट असं काही नसतं. जे आपल्या फायद्याचं आहे असं वाटतं आपण त्याला चांगलं म्हणतो आणि नाहीतर वाईट म्हणतो. म्हणजे चांगलं-वाईट आपणच ठरवतो.
८. या जगात असणाऱ्या वस्तूं फक्त गरजा भागविण्यासाठी वापरल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या मानवी ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकू.
९. कोणतंही काम करा त्यात दोष हा असणारच. म्हणून असं काम निवडा ज्यात कमीत कमी दोष असतील.
१०. आयुष्यात दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत- Silence आणि Love. कारण दोन्हीही आपल्याला अडकून नाही ठेवत, मुक्त करतात.
११. स्वतःला आणि इतरांना दुबळं समजणे किंवा तसं सांगणे हे सर्वात मोठं पाप आहे, आणि स्वतःवर विश्वास ठेवणे आणि इतरांनाही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणे हे सर्वात मोठं पुण्य आहे.
१२. Options नसतात असं नाहीये, options असतात. फक्त निर्णय घ्यायच्या वेळी आपल्या priorities वेगळ्या असतात. म्हणून एकतर ते options आपल्याला दिसत नाहीत किंवा दिसले तरी त्यानुसार जाण्याची आपली इच्छा/हिंमत नसते.
१३. आपण ज्यावर विश्वास ठेवू त्या गोष्टी/विचार खरे वाटतात आणि तेच आपल्याला घडवतात. म्हणून विश्वास ठेवायचाच असेल तर अशा गोष्टींवर ठेवू ज्या आपल्याला आपल्या अनुभवांशी जोडून देतील.
१४. सगळ्यात महत्त्वाचं, या जगात facts कमी, opinions च जास्त आहेत. म्हणून कशावर नि कुणावर विश्वास ठेवायचा, आणि किती react करायचं याचा विचार करायला हवा.