Last year of college, कॉलेजमध्ये असताना मी काल्पनिक विश्वात होतो. सारखा विचार असायचा – कॉलेज पूर्ण झालं की हे करू, ते करू, इतके तास काम करू. जसं की काय करायचं ते सगळं ठरलं होतं. आणि जेव्हा खरच कॉलेजमधून बाहेर पडलो, तेव्हा माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता – आता काय करायचं? कॉलेजमध्ये असताना तर खूप plans केले होते, आता काय? कारण नेमकं करायचं काय आहे हेच मला माहित नव्हतं, सुचतही नव्हतं. तो दिवस मला चांगला आठवतोय. अंधारच अंधार..
काय करायचं, कुठून सुरुवात करायची मला काहीच माहित नव्हतं. आणि त्यातून पळ काढण्यासाठी, timepass करण्यासाठी कुठेतरी admission घेणे, किंवा मग स्पर्धा परीक्षांची तयारी करणे, यातलंही काहीच करू शकत नव्हतो. म्हणजे माझ्यासमोर एकच option उरला होता – ‘नवीन काहीतरी शिकणे, स्वतःला घडवणे आणि स्वतःला ओळखणे.’ माझ्याकडे कोणतेच skills नव्हते, कोणा एका विषयाचं खूप knowledge आहे असंही नव्हतं. Means I had nothing. जसे तीन वर्षे मी वाया घालवले होते, No skills, No knowledge, No network काहीच नाही… I had achieved nothing. उलट जी अभ्यासाची ऊर्जा, जो उत्साह, जी आवड होती, challenge घेण्यात जी मजा यायची ते सगळंच गमावून बसलो होतो. Depressed झालो होतो, हा.. भीती मात्र कमावली होती मी.
तेव्हा मात्र मला माझी लायकी समजली. 250 पुस्तकं वाचलेले होते तेव्हापर्यंत (दोन वर्षांत), खूप काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला होता, काहीतरी करण्याचाही प्रयत्न केला होता, पण सगळं अर्धवट सोडून दिलेलं. तेव्हा एक मित्राने मला नाव दिलं होतं – Indifferent (कसलीही काळजी करत नाही, काहीही करतो)… म्हणजे मी ‘एक भरपूर क्षमता असणारा दिशाहीन मुलगा’ होतो. पण नशीब चांगलं होतं की मित्र चांगले मिळाले, घरचं वातावरण चांगलं होतं, पुस्तकं होती म्हणून मी वाईट मार्गाला लागलो नाही.
त्यानंतर Lockdown चं पूर्ण एक वर्ष घरी, फक्त विचार करण्यातच गेलं कि ‘करायचं काय आहे?’. मी tension मध्येच होतो, No Motivation. मग काहीतरी करायचं म्हणून class join केला, online courses घेतले, पण तेही भीतीने. त्यातही जर एखादा topic अवघड आला की माझी हालत खराब व्हायची. सोडून द्यावसं वाटायचं, बहुतेकदा सोडूनही दिलंय. म्हणजे मी एकूण सोप्या, मला comfort मध्ये ठेवणाऱ्या गोष्टी शोधायचो (कधीकधी पुस्तकं वाचणं त्यातलंच एक). Fight करण्याची इच्छा नि ताकत नव्हती उरली माझ्यात, confidence खूप कमी झाला होता. वाया गेलं सगळं, वय वाढतंय, खूप कमी वेळ आहे आपल्याकडे असं वाटायचं. पण माझ्या वडिलांच्या आणि कॉलेजच्या एक सरांच्या एका वाक्याने मला हायसं वाटलं नि मी शांत होत गेलो. ते वाक्य म्हणजे – ‘तुझं वय कितीक आहे असं, अजूनही तुझ्याकडे वेळ आहे..’ सोबतच मला काय आवडतं, माझ्या priorities काय हव्यात, मी काय करायला पाहिजे हे कळायला लागलं. अन त्यामुळे मी आज मजेत शिकतोय, कितीही अवघड वाटलं तरी सोडून द्यावसं नाही वाटत. उलट त्याला सोपं करून टाकतो.
इतकं सगळं सांगण्याचं एकच कारण, आपण सुरक्षित जागी बसून खूप plans बनवतो. पण जेव्हा खरोखर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र comfort शोधतो. म्हणून जर काहीही स्वप्न असले ना तर direct मोठे निर्णय घेण्याअगोदर, ते काम करून बघा. त्यात आवड निर्माण करा, ते काम शिकून घ्या मग पूर्णपणे त्यात उडी मारा. मी केलं तसं Fantasy मध्ये राहू नका. तुम्हाला एखादी गोष्ट करायचीच असेल तर त्यावर काम करायला लगेच सुरुवात करा. मग ठरवा कि पुढे काय करायचं.. सगळ्यात महत्त्वाचं, आवश्यक असल्यास थांबायला नि मागे वळायला कधीच घाबरू नका. Business मधला एक साधा नियम सांगतो – ‘तुम्हाला काय वाटतं यापेक्षा data आणि facts वर लक्ष द्या.’ Fantasy मध्ये राहू नका..