मी खरोखर प्रेमात पडलो होतो…

आठवतो मला बाकी तो पूर्ण दिवस, जेव्हा आपण भेटलो होतो,
पण नाही आठवत काहीच, जेव्हा तू मला घट्ट मिठी मारली होती,
जणू मी उरलोच नव्हतो, तुझ्यातच पूर्ण सामावून गेलो होतो..
तू मनात डोकावताच, नाही माहित कुठून पण सुंदर कविता मला सुचायच्या,
सोबत जेव्हा तू होती, कसलीच अपेक्षा उरली नव्हती,
सगळंच तर मिळालं होतं मला..
तू डोक्याने विचार केला, माझ्या तर भावना नि विचार एक झाले होते,
प्रयत्नपूर्वक मी काहीच नाही केलं, तुझ्यावरचं प्रेमच सगळं करवून घेत होतं,
कारण माझ्या भावना खऱ्या होत्या, मी खरोखर प्रेमात पडलो होतो…
हो, आनंद याचाच आहे की मी खरोखर प्रेमात पडलो होतो…

Leave a Comment

Scroll to Top