मी तुला बदलवत नाहीये, तर घडवतोय…

ती:- (त्याने तिला ति चुकीचं वागते आणि कसं वागावं हे सांगितल्यावर ती खूप चिडली) मला बदलून माझ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न नको करू. मी जशी आहे तशी राहूदे मला, आणि तसंच प्रेम कर.
तो:- (त्याच्यावर चिडून तिने आरोप केला तरीही तो एकदम शांत होता आणि शांतपणेच बोलला..)
ok… मला सांग, मी तुला कधी म्हटलो कि असे कपडे नको घालुस, अशी नको बसत जाऊस, तशी नको उभी राहुस, तशी hairstyle नको करू? Ummm?
ती:- (थोडी गोंधळुन, पण खाली पाहून) नाही..
ती:- मी तुला कधी म्हटलो का कि तू तुझी You Tube ची दुनिया सोडून दे आणि एखादा secure job कर किंवा मग फक्त घर सांभाळ?
ती:- (खाली पाहततिच्या अंगठीसोबत खेळतांना) नाही..
तो:- ok.. बरं मग मी तुला कधी म्हटलो का कि ‘तू मुलगी आहेस मुलीसारखी वाग, लोक नावं ठेवतील असं नको वागू’?
ती:- (नकारार्थक मान हलवून) कधीच नाही..
तो:- Hmmm… (तिचे दोन्ही खांदे पकडून) मग कशावरून मी तुला बदलण्याचा प्रयत्न करतोय?
ती:- (तिने फक्त त्याच्याकडे बघितलं)
तो:- Actually, मी तुझ्यावर प्रेम का करतो हेसुद्धा मला सांगता येणार नाही, तरीही I Love You a lot..
(तिने पुन्हा प्रश्नार्थक, गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघितलं..)
तो:- आणि राहिली गोष्ट तुला बदलून तुझ्यावर प्रेम करण्याची, तर ऐक.. मी तुला माझ्या पद्धतीने, माझ्यासाठी कधीही बदलण्याचा प्रयत्न नाही केला.
(तिला सोडून, थोडा मागे सरकून थोडा आवाज वाढवून आणि हातवारे करून बोलू लागला)
तो:- In fact मी तुला बदलण्याचा नाही, तर तुला घडवण्याचा, तुला सुधरवण्याचा प्रयत्न केलाय. जेणेकरून तू स्वतः जे तुझे स्वप्न आहेत ना ते पूर्ण करू शकशील. Comfort मध्ये राहून, सारखा विचार करून, tension घेऊन इतकी आळशी बनलीय, आणि सारखं उलटं सुलटं वाचून, ऐकून इतकी वेडी बनलीय कि स्वतःलाच त्रास करून घेतेय, वाटेल तो विचार करतेस. मग अशा परिस्थितीत तू जशी आहे तशीच राहून देऊ का तुला? का तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य रस्त्यावर आणू? बोल, तूच सांग…
(त्याने तिचे दोन्ही खांदे पकडताच तिने त्याच्याकडे बघितलं..)
तो:- आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझी काहीतरी गरज आहे म्हणून मी तुझ्यासोबत नाहीये, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी इथे आहे. आणि मला एखाद्यावर प्रेम करण्यासाठी त्या व्यक्तीला बदलण्याची अजिबात गरज नाहीये. पण त्या व्यक्तीने तिच्या highest potential ला unlock करण्यासाठी मला तिलाच बदलण्याची गरज पडली ना, तर मी ते करेन –
(आवाज एकदम सौम्य करून..) एक रोपट्याला सुंदर फुलं देणारं झाड बनवण्यासाठी, जे स्वतः आनंदी राहतं आणि इतरांनाही आनंद देतं…
(आता काय बोलावं हेच तिला कळेना, ती एकदम भावुक झाली आणि तिच्या नकळत तिच्या डोळ्यांत पाणी आलं.)

Leave a Comment

Scroll to Top