लेख-७

किती असुरक्षित वाटतं बघा हं.
          लक्ष्मण, त्याचा मुलगा आदेश याचं लग्न झालं. आदेश 37% ने बारावी पास झाला आणि पुढे शिक्षण सोडून दिलं. शेती बघायला लागला. मग त्याला जास्त शिकेल मुलगी कोण देणार ना? पण तरी त्याला भेटली १३वी पास मुलगी. जिला मध्येच कॉलेज सोडावं लागलं होतं. लक्ष्मणला वाटलं, मुलीला शिकण्याची इच्छा असेल तर तिला शिकुन द्यावं. त्याने त्याच्या मनातली ही गोष्ट मित्राला, सुदामला सांगितलं.
           सुदामने ते पूर्ण ऐकून घेतलं आणि भडकलाच! तो म्हणाला “वेडा झाला की काय तू? तुझा पोरगा बारावी शिकेल आणि तू म्हणतो सुनेला शिकण्याची इच्छा असेल तर तिला शिकुन द्यावं? अरे असं केलं तर ति त्याच्यापुढं निघुन जाईल आणि त्याला जमून देईल का? लोक काय म्हणतील? जोडी शोभेल का?”
         तसं सुदामचंसुद्धा काही चूक नव्हतं, वास्तवात असं घडतं. पण मला वाटतं, इथे आधार पाहिजे. एकमेकांना प्रगती करण्यात मदत करायला पाहिजे. तो/ति पुढे गेला/गेली म्हणजे आपली काही किंमत नाही राहणार, या भितीने त्याला का मागे ओढायचं? आणि जो पुढे जाईन त्यानेही का दुसऱ्याला झुकायला लावायचं? समाजात एकमेकांचा आधार हवा तर आपल्याला असुरक्षित वाटतं. जो कमी होण्यापेक्षा वाढत तर नाहीये ना? आणि तेही अगदी जवळच्या नात्यांमध्ये! विचार करायला हवा…

Leave a Comment

Scroll to Top