संवाद-२

संजना: काय गं, काय झालं? तुझं लग्न ठरवताय तिकडे आणि तू इकडं तोंड पाडून का बसलीय?
अंजली: ज्यावेळेस मन मानायला तयार नसेल तेव्हा काय करायचं?
संजना: म्हणजे?
अंजली: लग्नाच्या सुरुवातीलाच मन एकीकडे आणि शरीर दुसरीकडे. ही घुसमट कशी सहन करू मी? मनात एक आणि नजरेसमोर दूसरा! माहिती असताना की मी चुकीचं करतेय, तरी मला ते करावं लागतंय. आणि हे सगळ या समाजामूळ. इज्जतीकरता जिवंतपणीच माणसाला मारतात ते. I hate this so called समाज.
संजना: आणि मम्मी-पप्पा?
अंजली: त्यांचं काय? पारगी त्यांच्या ताब्यात आहे. त्यांना काय अडचण? त्यांची इज्जत तर राखली ना मी, बस! पण माझं काय? हा समाज पोखरून काढतो पार. त्यांच्याप्रमाणे वागा, नाहीतर लाहिलाही करतो आयुष्याची.वाटतं सडेतोड उत्तर द्यावं त्यांना, पण घर आठवतं लगेच. खरंच नाती कशाकरता असतात तेच नाही कळत. माणसाला सांभाळायला, त्याची सोबत करायला, चुकत असला तर त्याला मार्ग दाखवायला? का जसं समाजानं त्यांना स्वत:त सामील करून घेतलं, तसं बाकीच्यानासुद्धा जाणुनबुझुन त्या नरकात ओढायला? का? तर लोकांची आयुष्यभर सोबत मिळते, समाजात राहवं लागतं म्हणून. फक्त एक अट, आम्ही सांगू तसं राहायचं. अजब आहे…
संजना: तुझ्याकडे दुसरा काही मार्ग आहे का?
अंजली: काय करू मी? घरच्यांसाठी शांत बसावं लागतंय. लहानपणापासून त्यांनी जपलंय मला, आणि आज त्यांची मान झुकवणं म्हणजे… अवघड आहे यार सगळ.. पण हे घरचेसुद्धा लोकांमधी कधी सामील झाले गं? मुलीच्या आनंदापेक्षा त्यांना ‘लोक काय म्हणतील?’ हे कधी महत्वाचं झालं?
संजना: तो काय करत असेल आता?
अंजली: तो… Mesaage टाइप करत असेल नि delete करत असेल?
संजना: म्हणजे…
अंजली: मी सांगितलं, तो शांत बसला. त्याची हिंमत नसेल होत मला message send करायची. मला त्रास होईल ना, म्हणून… अवघड आहे सगळ…
संजना: अवघड आहे… हे बघ आता दोनच मार्ग आहे, एकतर जे चाललंय ते स्वीकार, नाहीतर स्वतः काहीतरी कर.
अंजली: मी काही करायला गेले तर तो स्वार्थीपणा होईल ना?
संजना: काय? स्वार्थीपणा? एक नंबरची घाबरट तू, खरं तर तू काय लोकांना दोष देते, आहे का तुझ्यात हिंमत स्वतःला स्विकारण्याची? खरं बोलण्याची? स्वतःची समजूत घालत बसते. जेव्हा सगळ हातात राहतं त्यावेळेस फक्त विचार करत बसते आणि वेळ आली का हे असं वागते. वेळ होती तेव्हा तुला सगळ नीट करता आलं असतं, कुणालाही न दुःखावता. पण नाही, वेळ असल्यावर काही करायचं नाही, आणि मग द्यायचा दोष कुणालातरी…
अंजली: काय करू मग मी? नाही हिंमत माझी, भिती वाटते मला.
संजना: कसली भिती?
अंजली: कसली ते नाही माहीत…
संजना: तुला तेच नाही समजत, तर काय दोष देते दुसऱ्यांना? खरं तर तुलासुद्धा भिती वाटते लोक काय म्हणतील याची. तुझ्या या बावळटपणामुळे किती आयुष्य खराब करतेय, माहितीय का तुला? सगळ्यात जास्त त्याचं… त्याने तुला किती वेळा सांगितलं की सगळ नीट होईल, आपण मिळून सगळ करू. आणि तू काय केलं?…लोकांना दोष देतेय.. सगळ तुझ्या हातात होतं, आणि सगळ तूच बिघडविलं. तुमच्यासाठी अवघड काहीच नव्हतं, पण तू केलं. तुझ्या या घाबरटपणामूळ…
अंजली: लहानपणापासून शिकवलं जातं ना आपल्याला, लोक नाव ठेवणार नाही असं वागावं.
संजना: कोणी नाव ठेवलं असतं तुला? आणि का? असा विचार तू केला फक्त, तुला वाटलं तसं. तुला माहीत होतं जे तू करतेय ते चांगलं आहे, स्वार्थीपणा नाहीये. जे करतेय त्यामुळे तू आणि बाकीचेसुद्धा आनंदी राहतील. पण तू असं बिघडविलं की आता सगळ बदललं… जरा खोल विचार कर, किती आयुष्य बदलली? आणि पुढे किती बदलतील?
अंजली: मग काय करू मी? मला माहीत होतं सगळ, पण घाबरले होते मी, पप्पाला काय वाटेल? ज्या मुलीवर ते गर्व करतात, तिने असं केलं?
संजना: अगं बावळट, जर मनात कधी काही करायचं आलं आणि विश्वास बसला की आपण हे बरोबर करतोय, वाईट नाही करत. फक्त अडचण implementation ची आहे. तर मार्ग शोधावे लागतात. Idea drop नसते करायची. घरकोंबडे जरा बाहेर निघुन बघ. किती अडचणी असतात त्या लोकांच्या जीवनात, आणि तू? तुम्हाला काही अडचणी नसताना तयार करताय. जी अवस्था लग्नानंतर काहींची खुप वर्षांनी होते ना, ति तुझी आता झालीय. त्यांचा नाईलाज असतो, पण तुझा? तू हाताने… त्याने जे गरजेचं ते सगळ केलं होतं. शेवटपर्यंत करत होता, पण तू साथ सोडली. विचार केलाय का, याचा काय परिणाम होईल? मुर्ख…
हे बघ, आता काय करायचं ना ते तू बघ. अजुन काही ठरलं नाहीये, वेळ आहे. सगळ नीट अजूनही होऊ शकतं. आणि जर नाही, तर चालुय ते चालु दे. गुपचुप सगळ स्वीकार… आता सगळ तुझ्याच हातात, फक्त नंतर रडत बसु नको. आणि असंही मन मारून जगण्याची तुला सवय आहेच. समजदार बनण्याचा आव आणतेय…

Leave a Comment

Scroll to Top