संवाद-१

माझा एक मित्र प्रसाद(खरं नाव जाणूनबुजून नाही देत), त्याच्यात आणि माझ्यात एकदा झालेला हा संवाद. जो मी लिहिताना थोडी मांडणी बदलली आहे…असंच बोलता बोलता त्याने मला विचारलं-

प्रसाद: संदिप, एक विचारू?
मी: Hmm…
प्रसाद: लोक अडचणीच्या वेळेस लांब जातात    
आणि आपलं सगळं चांगलं असलं की जवळ येतात. मित्रसुद्धा… असं का होतं?
मी: म्हणजे…काय झालं?
प्रसाद: अरे एक वेळ होती जेव्हा मला मित्रांची खूप गरज होती, घरच्यांची सोबत नसते मला  कधी, माहितीय ना तुला?
मी:मग?
प्रसाद: त्यावेळेस त्या सर्व मित्रांनी माझा हात सोडून दिला. मी पूर्ण एकटा झालो. त्यांनी  
अजून नवीन मित्र जोडले, पण मला
बाजूला केलं. पहिले काहीही करायचं असलं का मला सांगायचे, विचारायचे. पण नंतर मला सांगणंही बंद केलं. मी कधी भेटलो का मी वेडा असल्यासारखं माझ्याकडे बघायचे, माझ्यासोबत असणाऱ्यांना म्हणायचे ‘सांभाळा याला, काही करत बसतो’…
मी: मग आता? आता तुझं तर सगळं चांगलं आहे, मग? कुठे आहेत ते?
प्रसाद:मी नाही त्यांना जवळ करीत. तसं ते आनंदी आहेत, त्यांच्या दुनियेत. फक्त मी नाहीये त्यात… आता मला माझे मित्र भेटलेत, जसा तू. जे मला grow करायला मदत करतात, I am too happy…
मी: Good…मला सांग तू कोमजलेल्या झाडाजवळ जाशील का हिरव्या झाडाकडे?
प्रसाद: साहजिकच हिरव्या…
मी: का?
प्रसाद: का?
मी:कारण हिरवं झाड जे उभं असेन, सावली देईन, फळ देईन. ज्याच्या आजूबाजूला असलं की भारी वाटतं. जिवंत वाटतं. तसंच हे माणसाचं… तुझ्या चेहऱ्यावर बारा वाजेल असले तर कोणी तुला जवळ नाही करणार, पण तेच तुझ्या चेहऱ्यावर हसू असेल तर, आनंदी दिसला, मजेत असला, हसून खेळून राहणारा असला तर सगळ्यांना तुझ्यासोबत बोलावं, राहू वाटेल.
प्रसाद: पण असं का? आणि ते तर माझे मित्र होते…
मी: ते मित्र नाही, फक्त सोबती होते. जे कॉलेजमुळे तुझ्यासोबत आले. तुमच्यात काय सारखं असेल त्यामुळे तुम्ही मित्र म्हणजे सोबती बनले.
प्रसाद:Ohhh…
मी: आणि आपल्या आयुष्यात आपल्यालाच आनंद शोधावा लागतो. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, इथपर्यंत तुझी गर्लफ्रेंड किंवा बायकोसुद्धा तुला मदत नाही करणार. तेसुद्धा एक ठराविक काळाने सोडून देतील… म्हणून प्रत्येकाने स्वतःला strong बनविलं पाहिजे…
प्रसाद: जसं तू स्वतःला केलं?
मी: असं म्हण…हो पण याचा अर्थ असा नाही की लोकांना, नातेवाईकांना सोडून द्यायचं. माणूस एकटा नाही जगू शकत, सोबत लागतेच. फक्त नाती जपता आली पाहिजे.
प्रसाद: आणि ते शिकवायला तू आहेचस की!
मी: नक्की!

Leave a Comment

Scroll to Top