हा बदल कसा?

काल रस्त्याने अचानक ‘तो’ भेटला,
खूप दिवसांनी भेटला.
आधी
जेव्हा भेटायचा, खाली मान घालून,
शांत, खिशात हात
चेहऱ्यावर कधी हसू नाही,
खांदे झुकलेले असायचे कायम,
आयुष्यात आनंद देईल असं काही उरलच नाहीये जणू, असा.
पण,
आज वेगळाच वाटला.
उंच मान, सरळ खांदे,
आणि मनमोकळ हसताना तो दिसला.
जवळ गेलो,
हसून त्याने स्वागत केलं.
थोडा वेळ गेला,
खूप छान बोलला तो.
मग मलाच राहवलं नाही नि मी विचारलंच,
हा बदल कसा म्हणून?
त्याने हलके स्मित केले,
आणि बोलला.
‘आधी माझा आनंद कुणाचीतरी मक्तेदारी होती,
त्याच्या हुकुमावरून चालायचो मी.
पण आता माझा आनंद मला माझ्यात अन् माझ्या कामातच सापडलाय,
म्हणून मी आता असाच असतो कायम.
आणि हे सगळं जग खूप सुंदर दिसतंय रे आता. अपेक्षा नाही उरल्यात जास्त आता कुणाकडून,
आणि आनंदी राहण्याचाही अट्टाहास नाही उरला,
उरलं ते फक्त मनमोकळ जगणं,
आणि शक्य तिथे, शक्य त्याला देत जाणं.
बस्स…’

Leave a Comment

Scroll to Top