Breakup झाल्यानंतर काही लोक त्याच व्यक्तिसोबत(ex) friends म्हणून राहण्याचा विचार करतात. जेणेकरून त्यांच्यासोबत राहताही येईल आणि ब्रेकअपचा त्रासही होणार नाही.
पण इथेच ते चुकतात. ब्रेकअप नंतर गरज असते ती त्या व्यक्तिपासून दूर जाऊन, एकट्यात वेळ घालवून स्वतःला सावरण्याची, झालेल्या चुका तपासण्याची, त्यातून शिकण्याची आणि move on करण्याची.
पण आपण जेव्हा त्याच व्यक्तिच्या touch मध्ये राहतो तेव्हा move on करणं खुपच कठीण होऊन जातं. आपण ते सगळ विसरायला लागतो ज्यामुळे break up झालं होतं आणि पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतो (relation मध्ये). कधीच कोणत्याही तिसऱ्या व्यक्तिसोबत relation मध्ये जायला तयार नसतो. आणि गेलो तरी तितकं loyal राहु शकत नाही जितकं पहिलं होतं. अशा वेळेस अनेक गोंधळ तयार होतात.
अजुन, अशा गोंधळाच्या वातावरणात आपलं आपल्या कामावर, शिक्षणावर, करियर वर काहीच लक्ष उरत नाही. आपण भरकटत जातो. कोणतेही निर्णय खात्रीपूर्वक नाही घेत, आणि त्यामुळे फक्त गोंधळच तयार करून ठेवतो. मग कायम विचारांत, tension नि काळजीत. ज्याचा त्रास फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या आजुबाजुला असलेल्या लोकांनाही होतो. तरीही आपण इतके का suffer करतोय याचं उत्तर मिळत नाही. आपण झालेल्या चूका समजून घेऊन त्या सुधारण्यापेक्षा अजुन जास्त चूका करायला लागतो. जिथं विचार करून निर्णय घ्यायचा, तिथे पुन्हा भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतो, आणि most of the time तेही त्रास देणारेच. खुप त्रास देणारी phase असते ही. त्यामुळे ब्रेकअपनंतर friends म्हणून एकत्र राहणं धोक्याचच ठरतं
म्हणून ब्रेकअप नंतर स्वतःला काही वेळ देण्याची गरज असते, काही गोष्टी समजून घेण्यासाठी, झालेल्या चुकांमधुन शिकण्याची, स्वतःला सावरण्यासाठी आणि आपलं आयुष्य घडविण्यासाठी. म्हणून अशी चूक कधीही करू नये.