प्रेम…

तिनं त्याला पाहिलं, त्यानेही तिला बघितलं,
दोघांनी एकमेकांच्या डोळ्यांत काहीतरी बघितलं
ति त्याला म्हणाली- आपण लग्न करू…
नाही, नको..,
पण का?
तो म्हणाला- तू तरुण, मीही तरुण
माझं मन अस्वस्थ, तू ही अस्वस्थ,
हजारो अनुत्तरित प्रश्न दोघांच्याही मनात
तुला एकटं-एकटं वाटतं, मलाही
म्हणून ओढ एकमेकांची दोघांनाही लागली
पण दोघेही अर्धवट,अपूर्ण..
माझ्या सुखासाठी तू, तुझ्यासाठी मी
पण फक्त काही काळ, पुन्हा तिच अस्वस्थता
तात्पुरते धागे हे, आयुष्यभर अडकवुन ठेवणारे..
आपण एक नक्की होऊ
पण तू तुला शोध, मी मला शोधतो
मग तू पूर्ण, मीही पूर्ण
असेन ‘प्रेम’ आपलं असिमित, भिती कसलिही नसेल जिथे
भेटु पुन्हा…

1 thought on “प्रेम…”

Leave a Comment

Scroll to Top