लेख-५

आपण माणसं आहोत, ज्याला शरीर, मन, भावना, बुद्धि आहेत. काही विशिष्ट आवडी-नावडी असतात. पण आपण त्याकडे कधी लक्षच देत नाही. जसे लोक घेऊन जातील तसे फक्त वाहत जातो. म्हणून कधी स्वतःवर कामच करत नाहीत. स्वतःवर काम करणे म्हणजे शरीर, मन, भावना, बुद्धि यांच्यावर लक्ष देणे. स्वतःला fit बनविणे, फक्त शरीराने नाही तर मन, भावना आणि बुद्धिनेसुद्धा.
         जन्मापासून आपल्यावर वेगवेगळे संस्कार होत आलेले असतात. त्यात घर, समाज, शाळा, मित्र यांचा खुप मोठा वाटा असतो. आणि या सगळ्यात आपण स्वतःबद्दल स्वतःच्या काही धारणा तयार करतो, स्वतःवर ठप्पे लावतो. आपण सतत इतरांसोबत स्वतःलाही सांगत असतो- मी असा नाही तसा आहे, मला ते नाही हे आवडतं, मी या या दृष्टीने वेगळा आहे आणि त्यात स्वतःला बसविण्याचा प्रयत्न करतो. आपला एक विशिष्ट स्वभाव तयार करतो. आणि नेमका तोच आपल्याला आनंदी होण्यापासून दूर ठेवतो. सतत विचार करतो लोक काय म्हणतील, माझी image बिघडेल. आणि यामुळे आपण विचारांमध्येच जास्त असतो. Present मध्ये कधी राहतच नाही, परिस्थितिला accept करुनच घेत नाही. विचारांमध्येच जगतो, कल्पनाच करत बसतो,
मग भलेही ते त्रास देवो.
        कधी घरात एकटे असाल आणि एखादं लहान मूल सोबत असेल. तर तुम्ही त्याच्यासोबत खेळता, त्याला हसवता, तो म्हणेल तर घोडासुद्धा बनता. कधी त्याच्यासोबत नाचताही. त्याला हसविता आणि तुम्हीही मनमोकळ हसता. का? तिथे आजुबाजुला कुणी नाही म्हणून? ते बाळ तुम्हाला judge नाही करणार म्हणून? आपल्या धारणा, विचारांना कोणी दु:खविणारं नसतं म्हणून? त्यावेळेस तुम्ही स्वतःला विसरलेले असता. त्या बाळाला पाहून तुम्हालाही वाटतं आपण याच्यासारखं खेळावं, हसावं, मस्ती करावी. जे करायला तुम्ही स्वतःला अडविता जेव्हा बाकी लोकांसोबत तुम्ही असता, कारण ते तुम्हाला नाव ठेवतील. तुमच्या आशा कोलमडुन जातील. इतक्या वर्षांपासून तुम्ही स्वतःची जी image बनविलेली असते ती तुटण्याची भिती वाटते. हो ना? पण या सगळ्यात स्वतःला मारावं लागतं, आलेल्या आनंदाला दूर करावं लागतं.
         एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही म्हणता ना की मी असा आहे तसा नाही, मला नाही आवडत हे, त्यावेळेस तुम्ही स्वतःला स्वत:पासून तोडतात, आनंदी होण्यापेक्षा काहीतरी गमावल्याची भावना तयार होते. कधी मनात काही मस्ती करावीसी वाटली तरी तुम्ही स्वतःला अडवितात. आणि विचार करतात-‘काय timepass आहे हा, नुसता पोरखेळ आहे’, ‘हे लोक कधी सुधारतील देव जाणो’, पण खरं तर तेव्हा तुम्ही करू शकत नाही म्हणून इतरांबद्दल तसं बोलतात. खरच स्वतःला प्रश्न विचारावा- मी माणूस होतो, Robot तर नाही ना झालो?
        माझा एक अनुभव आहे- मीसुद्धा खुप serious असायचो. स्वतःला काही विचार, ठप्पे, इतरांपेक्षा मी कसा वेगळा यात बसविण्याचा प्रयत्न करायचो. लोकांनी मला मान सन्मान द्यावा, ‘काय पोरगा आहे हा, वाह!’ असं बोलावं, असं वाटायचं. आणि त्या नादात मी कधीच मनमोकळेपणाने जगलो नाही. कायम विचार करत, सुरक्षित, सीमेच्या आतच. त्यामुळे माझे कोणीच जवळचे मित्र नाही बनले, जे होते तेसुद्धा दुरावले. त्यात माझं tension वाढत गेलं, मला कळतच नव्हतं की असं का होतय म्हणून. त्यावेळेस मी स्वतःला एक महिन्याचा वेळ दिला आणि या एक महिन्यात मी वाचनही केलं, सोबत स्वतःचं परीक्षणही केलं. त्यावेळेस मला सगळ समजलं, जे मी वरती मांडलंय.
          त्यानंतर मी स्वतःला कधीच serious नाही घेतलं. स्वतःला कधीच अडकुन नाही ठेवलं. कधीच ‘मी असा आहे नि तसा आहे’ नाही बोललो. स्वतःलासुद्धा. आणि हळूहळू मी मजेत जगायला सुरुवात झाली. एक sentence जे माझ्या कायम लक्षात राहिलं…
No one takes you seriously, when you take yourself too seriously.
        म्हणून Robot व्हायचं की माणूस म्हणून जगायचं, हे तुमच्या हातात!

Leave a Comment

Scroll to Top